पंतप्रधान मोदींनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट ; उपराष्ट्रपतींचे महत्वपूर्ण ट्विट

05 Jul 2020 15:13:25

pmo_1  H x W: 0




नवी दिल्‍ली :
भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली. ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन ही भेट घेतली. देशासमोर असलेल्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर ३० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.




तर दुसरीकडे, उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक महत्वपूर्ण ट्विट केले आहे, यात "भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक देशांतर्गत आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण एकत्र आणि दृढ निश्‍चयी असायला हवे," असे म्हणण्यात आले आहे.




शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेह-लडाखचाा दौरा केला. यावेळी तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. 'विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,' अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिली होती.तसेच भारत सरकार आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लाऊन पूर्ण ताकदीनिशी उभे आहे, हेही पिपल्‍स लिब्रेशन आर्मीला (PLA) दाखवून दिले आहे.
Powered By Sangraha 9.0