अक्षरांचा जादुगर हरपला !

05 Jul 2020 15:32:52
Kamal Shedge _1 &nbs



अक्षरसम्राट' सुलेखनकार कमल शेडगे यांचे निधन

मुंबई : मराठी नाटय़ आणि साहित्यसृष्टीवर ज्यांच्या अक्षरांनी अक्षरश: साम्राज्य गाजवलं, असे 'अक्षरसम्राट' सुलेखनकार कमल शेडगे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने मुलुंड येथील घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. नाटकांच्या जाहिरातींतील त्यांच्या जादुई अक्षरांनी रसिक प्रेक्षकांना नाटय़गृहांकडे खेचून घेण्याचे काम वर्षानुवर्षे केले. गेली साडेपाच दशके अक्षरांच्या दुनियेत मुशाफिरी करतानाच शेडगे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. कालच त्यांनी एका नाटकाच्या शीर्षकाचे काम पूर्ण केलं होतं.त्यांच्या निधनाने कला आणि प्रतिभेचा चमत्कार हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.






Kamal Shedge1 _1 &nb
Powered By Sangraha 9.0