मुख्यमंत्र्यांना गाडी आणि अक्षय कुमारला हेलिकॉप्टर कसं?

    दिनांक  04-Jul-2020 14:56:40
|

akshay kumar_1  अक्षय कुमारचा नाशिक हेलिकॉप्टर दौरा वादात! छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश


मुंबई : अभिनेता अक्षय कुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. एका खाजगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.


अक्षय कुमारच्या नाशिक येथील हेलिकॉप्टर दौऱ्याची चौकशी केली जाणार आहे. चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा सध्या मिळत नाही. मग अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली याची चौकशी केली जाणार आहे.


अक्षय कुमारने चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर भेट दिली होती. वैद्यकीय कारणांमुळे अक्षय नाशिकला आला होता, अशी चर्चा होत आहे. तर याचसाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती,असे ही म्हंटले जात आहे. अक्षय कुमारने त्रंबकेश्वरजवळील एका रिसॉर्टवर मुक्काम केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून फिरतात अन् अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची सुविधा कशी मिळाली तसंच नाशिक जिल्हा प्रशासनाने अक्षयला व्हीव्हीआयपी सुविधा कशी दिली, याची चौकशी करण्याचे आदेश छगन भुजबळ यांनी दिली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.