कोरोना इफेक्ट : अखेर उबरचे' मुंबईतील कार्यालय बंद!

04 Jul 2020 18:15:20
uber_1  H x W:


मुंबईतील कार्यालय बंद, मात्र कॅब सेवा सुरु राहणार!

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उबरने आपले मुंबईतील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर ४५ कार्यालये बंद करण्याच्या निर्णयाअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र मुंबईकरांसाठी उबरची राईड-शेअरिंग कॅब सेवा सुरुच राहणार आहे. अॅप आधारित कॅब सेवा देणारी अमेरिकन कंपनी उबरने याआधीच देशात कर्मचाऱ्यांची कपात केली होती.


उबर कंपनीचे मुंबईतील कार्यालय कुर्ला परिसरात आहे. उबरच्या मुंबई कार्यालयात सुमारे २५ कायमस्वरुपी कर्मचारी आणि १५० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी काम करतात. कार्यालय बंद करण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु ऑपरेशन आणि पॉलिसीअंतर्गत काही कर्मचारी काम करतील असे कंपनीने सांगितले.


कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे जगभरातील उबरच्या कारभारावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कंपनीला अनेक कार्यालये बंद करावी लागली. उबरचे जगभरात एकूण ६ हजार ७०० कर्मचारी आहे. त्यापैकी भारतातील ६०० कर्मचाऱ्यांना आधीच नारळ देण्यात आला होता. जागतिक स्तरावर कंपनीने आपल्या ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांनाची कपात केली आहे.

 
Powered By Sangraha 9.0