पबजीचे वेड ; १६ वर्षीय मुलाने गेममध्ये उडवले १६ लाख !

04 Jul 2020 16:47:06

PUBG_1  H x W:
पंजाब : सध्या कोरोनाच्या वादळामुळे लॉकडाऊनची परिस्थिती देशभर आहे. अशामध्ये सर्वचजण घरी बसून काम करत आहेत. गेले ३ महिने घरी बसायला लागल्यामुळे अनेकांच्या मानसिकतेवर प्रश्न उभे राहतील अशा काही घटना समोर येताना दिसत आहेत. पंजाबमध्ये पबजी या गेमच्या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने आई वडिलांचे तब्बल १६ लाख रुपये उडव्ल्यची घटना समोर आली आहे.
 
 
पबजी या खेळाचे वेड आधीपासूनच देशातील तरुणांना लागले होते. अशामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या खेळाचे व्यसन वाढल्याचे अनेक बातम्यांमधून समोर आले. अशामध्ये या बातमीने सर्व पालकांची झोप उडवली आहे. या १६ वर्षीय तरुणाचे वडील आजारी असून त्यांच्या उपचारासाठी हे पैसे जमा करण्यात आले होते. ही त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी होती.
 
 
तरुणाने त्यांच्या बँक खात्याच्या माहितीने पबजी गेम अपग्रेड आणि गेममधील काही खरीदीसाठी या खात्यांचे कार्ड वापरली. त्याने मित्रांसाठी या खेळामधील खरेदीसाठी या खात्यांमधील पैश्यांचा वापर केला. त्याच्या कुटुंबाला बँक स्टेटमेंटद्वारे या सर्व उलाढालीचा पत्ता लागला आणि त्यांनी डोक्यावर हातच मारून घेतला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “ मुलाने हे सर्व व्यवहार आईच्या मोबाईलवरून केले. आम्हाला आधी वाटले की हा मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करत आहे.” या सर्व घटनेमुळे पबजी या गेमच्या व्यसनापुढे अनेक प्रश्न उभे राहतात.
 
Powered By Sangraha 9.0