न्यूयॉर्कमधील भारतीयांचा 'बॉयकॉट चायना'चा नारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |

new york_1  H x




न्यूयॉर्क :
भारतीय वंशाच्या नागरिकांनी शुक्रवारी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये चीनविरोधात निषेध करत ‘बॉयकॉट चायना’ मोहिमेस पाठिंबा दर्शविला. या प्रदर्शनात तैवान आणि तिबेटी मूळचे स्थलांतरित नागरिकही सहभागी झाले. चीनविरोधी बॅनर व पोस्टर्स दाखवत या नागरिकांनी निदर्शने केली. निषेधाच्या वेळी आंदोलकांनी चीनबरोबर व्यापारावर बंदी घालण्याचे व चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. टाइम्स स्क्वेअरवर झालेल्या निदर्शनात सहभागी अनेक लोक म्हणाले की, चिनी मालावर बहिष्कार टाकणे आवश्यक आहे. एका निषेधकर्त्याने म्हणाले आहे की, चीनचा सामना करायचा असल्यास सर्वप्रथम त्यासोबत असणारे आर्थिक व्यवहार थांबविणे गरजेचे आहे.



new york_1  H x


'अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटी' या भारतीय संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेवाणी म्हणाले की, भारतीय सैन्यावर हल्ला करून चीनने आपला खरा चेहरा दाखविला आहे. केवळ भारतच नाही तर अनेक देशांना त्रास होत आहे. चीन देखील आपल्या देशातील नागरिकांसाठीदेखील समस्या बनत आहे. झिनजियांग प्रांतातील उघूर मुस्लिमांचे हक्क हिसकावून घेण्यात आले आहेत. या निदर्शनात सहभागी तिबेटीयन नागरिक म्हणाले की, चीनमुळे त्यांची संस्कृती धोक्यात आली आहे. हजारो लोकांना तुरुंगात टाकले गेले आहे. तिबेटचे नेते डोर्जी टेस्टन म्हणाले की, आम्ही भारत आणि अमेरिकेला चीनशी सामना करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की वेळीच चीनवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.


new york_1  H x
@@AUTHORINFO_V1@@