'हिरो सायकल'चा चीनला दे धक्का!

04 Jul 2020 15:48:28

Hero_1  H x W:


हिरो सायकलने चीनसोबतचा ९०० करोडचा व्यापारी करार केला रद्द!

मुंबई : गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर केंद्र सरकारने डिजिटल स्ट्राइकद्वारे चीनचे ५९ अ‍ॅप बंद केले. आता हिरो सायकलनेही चीनला मोठा धक्का दिला आहे. हीरो सायकलचे एमडी पंकज मुंजाल यांनी चीनबरोबरचा ९०० कोटींचा व्यवसाय करार रद्द करण्याची घोषणा केली.


हिरो कंपनीकडून हाय-एंड सायकल तयार करण्यासाठी चीनमधून सुटे भाग आयात केले जातात. यांतून दरवर्षी चीनशी जवळपास ३०० कोटींचा व्यवसाय होतो. यंदा या आयतीअंतर्गत चीनकडून सुमारे ९०० कोटींचे भाग खरेदी केले जाणार होते. मात्र चीनच्या या कृत्यानंतर हिरो सायकलने हा करार रद्द करत या पुढे चीनशी कुठलाही व्यापारी करार न करण्याचा निर्णय घेतला आहे.


हिरो सायकलचे एमडी पंकज मुंजल यांनी हिरो सायकलने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना सांगितले की, हिरो सायकल दरवर्षी चीनशी ३०० कोटी रुपयांचा व्यवसाय करते आणि तीन किंवा चार वर्षे एकत्र करार करतो. यावेळी, ९०० कोटींचे ऑर्डर चीनला देण्यात आले होते, मात्र गलवान प्रकरणानंतर हा करार हीरो कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. चीन ऐवजी हे भाग जर्मनीतून आयात केले जाणार आहेत.


लॉकडाऊननंतर सायकलची मागणी वाढल्याचे मुंजाळ यांनी सांगितले. जिम बंद आहेत, म्हणून फिटनेससाठी दुचाकी निवडत आहेत. भविष्यात कंपनी स्वतः सुटे भाग ही तयार करण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0