गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांची कहाणी सांगणार अजय देवगण!

04 Jul 2020 12:02:54
Ajay Devgn_1  H


गलवान खोऱ्यातील संघर्षावर तयार होणार चित्रपट; अजय देवगण करणार निर्मिती


मुंबई : अभिनेता आणि निर्माता अजय देवगण लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारत-चिनी सैन्यामधील चकमकीवर चित्रपट तयार करणार आहेत. चिनी सैन्याशी लढा देताना शहीद झालेल्या २० सैनिकांच्या बलिदानाची कथा या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. तथापि, चित्रपटाचे नाव व कलाकार याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही.


फिल्म समीक्षक व व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'अजय देवगण गलवान व्हॅलीच्या वादावर चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटात चिनी सैन्याशी सामना करणाऱ्या २० भारतीय सैनिकांच्या बलिदानाची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. चित्रपटाची कास्ट अद्याप निश्चित झालेली नाही.’


या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण एफफिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी प्रॉडक्शन कंपनी करणार आहेत. १५ जून रोजी लडाखच्या पूर्वेकडील भागात असलेल्या गालवान व्हॅलीमध्ये चीनी सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यात हिंसक चकमक झाली. या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाले.
Powered By Sangraha 9.0