सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याचा मोबाईल वापरतेय रिया ? कंगनाने दिले पुरावे

31 Jul 2020 15:58:28
RheaChakroborty _1 &





नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता आणखी गुंतागुंतीचे होत चालले आहे. प्रत्येक दिवशी आणखी एक खुलासा होत आहे. बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत या प्रकरणी गंभीर आरोप करताना दिसत आहे. कंगनाने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर टीम कंगना रणौततर्फे एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आता बिहार पोलीसही रिया चक्रवर्तीच्या अटकेची तयारी सुरू करत आहेत. 


दरम्यान, सुशांतच्या एका फॅनने एक स्क्रीनशॉट शेअर केला. ज्यात सुशांतच्या अकाऊंटद्वारे आलीया भट्टला फॉलो करण्यात आले होते. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतरही हे अकाऊंट कोण वापरत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे, हा प्रश्न त्या फॅनला पडला. त्याने याबद्दलचा स्क्रीनशॉट शेअर केला. "सुशांतचा स्मार्टफोन कोण वापरत आहे, त्याच्या अकाऊंटवरून आलीयाला का फॉलो केले आहे, माझ्या ट्विटर अकाऊंटवर एक नोटीफिकेशन आले आहे. 


टीम कंगना रणौतने हे ट्विट रिट्विट करून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. "सुशांतच्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. रियाकडे सुशांतचे सर्व गॅजेट्स आहेत. महेश भट्ट यांच्या आदेशावरून तिने आलीयाला फॉलो केले असवे. सुशांतच्या कित्येक पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत," सुशांतचा फोन कोणीतरी वापरत आहे, असा आरोप ततिने लावला आहे. कंगनाच्या आरोपांमुळे या प्रकरणी आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. तिने महेश भट्ट यांनाही या प्रकरणात खेचले आहे. 


बॉलीवुडमध्ये सुरू असलेल्या गटबाजी आणि घराणेशाहीचा शिकार सुशांत झाला, असा आरोप कंगनाने केला आहे. बिहार पोलीस सध्या मुंबईत पोहोचले आहेत. रिया चक्रवर्तीच्या तपासाची सर्व तयारी पोलीसांनी केली आहे. बिहार पोलीसांनी मुंबईत येऊन सुशांतच्या बँक खाते क्रेडीट डेबिट कार्ड आदींची माहिती घेतली आहे. सुशांतच्या खात्यात अफरातफर झाली असल्याचा पुरावा पोलीसांना मिळाला आहे. रियाच्या चौकशीसाठी तिला ताब्यात घेण्याची तयारी पोलीस करण्याची शक्यता आहे. पाटण्याहून महिला पोलीसांचे पथक मुंबईला रवाना होईल. 


सुशांत सिंहच्या वडिलांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. रियाला त्यांनी त्याच्या मृत्यूचे कारण मानले आहे. तिनेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही त्यांनी केला. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे रियाच्या परिवार आणि साथीदारांविरोधात एफआयआर नोंदवली आहे. तक्रारीत सुशांचा लॅपटॉप, त्याचा पासवर्ड आणि दागिने घेऊन रिया पसार झाली होती, असा आरोप वडिलांनी केला आहे.तसेच त्याचे पैसेही हडपण्याचा डाव आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीविरोधात सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग केले जात आहे. सुशांतच्या फॅन्सने हे प्रकरण सीबीआयकडे नेण्याची मागणी केली आहे.













Powered By Sangraha 9.0