'पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते'

    दिनांक  31-Jul-2020 19:17:59
|


प्रातिनिधिक फोटो _1 
औरंगाबाद :
पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं असा सणसणीत टोला भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात असेही ते म्हणतात. औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. भर पावसात रावसाहेब दानवे भाषणाला उभेच राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा सणसणीत टोला रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला. आता मी देखील पावसात भाषण केलंय, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांच्यावर रावसाहेव दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर पावसात भाषण कधी करायचे, हे रावसाहेब दानवेंना अजून कळणार नाही असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.