कोरोना नियंत्रणात तर मृत्यूदर का वाढतोय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |

devendra_1  H x



मुंबई :
मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातं. मग मुंबईतील कोरोनाचे मृत्यू का वाढत आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून ज्या ताकदीने कोरोनाशी लढायला हवं, तितक्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही असे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकरावर निशाणा साधला.




देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे व्हिजन याबद्दल आपलं मत मांडलं. त्यावेळी, राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून ज्या ताकदीने कोरोनाशी लढायला हवं, तितक्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही. मुंबईत कोरोनाच्या टेस्ट वाढवायला हव्या, पण टेस्टही वाढविण्यात येत नाहीत, देशात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर महाराष्ट्रात असल्याचेही त्यांनी सांगितले.




दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नामुळे दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही त्यांनी सांगितले. टेस्टिंग वाढविल्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य झाले. महाराष्ट्रात देखील टेस्टिंग वाढविल्या पाहिजे."आपल्याकडे टेस्ट कमी होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसत आहे. आपल्याकडे कॅपिसिटी असतानाही पाहिजे तेवढ्या टेस्ट होत नाही. उलट लोकांनाच टेस्ट करायला सांगितले जाते आहे. हे चुकीचं आहे. महाराष्ट्राने दिल्लीप्रमाणे टेस्टची संख्या वाढवली पाहिजे. टेस्टची संख्या अधिक वाढवल्यास रुग्णांची संख्या वाढेल. पण कोरोना लवकरात लवकर नियंत्रणात येईल, असे ते म्हणाले. मुंबईत टेस्ट कमी होत असल्याने कोविड सेंटर रिकामे पडलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे सांगितले जातंय. मग मुंबईतील कोरोनाचे मृत्यू का वाढत आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला.
@@AUTHORINFO_V1@@