सुशांतचे फॅन्स म्हणतात, 'ये बिक गई है गोरमिंट...'

31 Jul 2020 16:28:24
SSR _1  H x W:

 



मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून ज्या प्रकारे बिहार पोलीसांचा तपास सुरू आहे, त्यावरून आता मुंबई पोलीसांना ट्रोलिंगचा सामाना करावा लागत आहे, दरम्यान महाराष्ट्र सरकारविरोधातही सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सनी ट्विटर मोहिम सुरू केली आहे. #MahaGovtSoldOut या हॅशटॅगद्वारे सरकारवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून टीका केली जात आहे. मुंबई पोलीसांनी सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावर दाखवलेल्या दिरंगाईचा परिणाम पोलीसांना ट्रोलिंग करण्यात झाला आहे. 


कोरोना संकटात आपल्या प्राणांची बाजी लावून कौतूकास्पद कामगिरी करणाऱ्या मुंबई पोलीसांना एका प्रकरणामुळे अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका आता भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण हाताळण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असे म्हटले होते. 


हे प्रकरण आम्ही सीबीआयकडे देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते, यावरून त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला होता. कंगना रणौतने या प्रकरणावरून बॉलीवुडसह अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी बिहार पोलीसांनी आता पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. बिहार पोलीसांत सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात केली आहे. बिहार पोलीस गुरुवारी ऑटो रिक्षामध्ये बूसन प्रवास करत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.


यावरूनही अनेकांनी मुंबई पोलीसांवर टीका केली आहे. आता सुशांत सिंहचे फॅन्स दोन्ही पोलीस दलांमध्ये कारवाईचा फरक दाखवून या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही या प्रकरणात प्रचंड टीका सहन करावी लागत आहे. सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे तिच्यावरही टीका करण्यात येत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हीनेही गंभीर आरोप लगावले आहेत. सुशांतच्या प्रकरणावर 'टीम कंगना रणौत' या ट्विटर हँडलद्वारे दररोज नवनवे आरोप केले जात आहेत.











Powered By Sangraha 9.0