सोनू सुद बनला त्या तीन अनाथ मुलांचा पालक

    दिनांक  31-Jul-2020 17:51:47
|

sonu sood _1  H
 
मुंबई : लॉकडाऊनमध्ये गोरगरीब मजूरांना मदत करण्यासाठी ज्या प्रमाणे अभिनेता सोनू सुद पुढे आला, त्यामुळे त्याची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या या अभिनेत्याने अनेकांच्या आयुष्यात खराखुरा 'नायक' बनून मदत करणारा देवदूत ठरला आहे. सोनू सुदने शुक्रवारी अशाच प्रकारे १० मिनिटांत पुढचा मागचा विचार न करता तीन अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे. 


तेलंगणा येथे यादाद्री भुवनागिरी जिल्ह्यात तीन मुलांनी आपले पालक गमावले आहेत. त्यापासून या लहान मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक व सामाजिक संस्थांनी त्यांची तात्पुरती सोय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुढील शिक्षण आणि अन्य कारणास्त्व त्यांची गैरसोय होत होती. 
या अनाथांना वाली कोण, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारत सोनू तुम्ही त्यांना मदत करा, असे ट्विट केले. सोबतच https://youtu.be/BEv8gDAlRPc या युट्यूब चॅनलवर प्रकाशित झालेल्या त्यांच्या वृत्ताची लिंक शेअर केली. सोनू सूदने पुढील १० मिनिटांतच त्याला उत्तर देत ते तीघेजण आता अनाथ नाहीत. मी त्यांची जबाबदारी स्वीकारतो, असे म्हटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.