राममंदिराचं ई-भूमिपूजन नको ; जल्लोषातच भूमिपूजन हवं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |

mns_1  H x W: 0




मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचे ई-भूमिपूजन करण्याचा केंद्र सरकारला सल्ला सामनामधील मुलाखतीदरम्यान दिला होता. याच मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य कार सेवकांनी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं. सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची ही वेळ का निवडली हे कळतं नाही. परंतु राम मंदिराचे भूमीपूजन धुमधडाक्यातच व्हायलाच पाहिजे, ई-भूमीपूजन कशाला हवं ? अशी परखड भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली आहे.






याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, राम मंदिराचे भूमीपूजन होतंय त्याचा अभिमान आहे, पण कोरोना काळात भूमीपूजन होण्याऐवजी आणखी २ महिने भूमीपूजन पुढे गेले असते तर बरं झालं असतं, कारण मोठ्या उत्साहात लोकांना हा सोहळा साजरा करता आला असता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र असा ऐतिहासिक सोहळा हा धुमधडाक्यातच व्हायला हवा. करोनाचं संकट आहे म्हणून त्यावर ई-भूमिपूजन होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको. राममंदिराचं जल्लोषात भूमिपूजन हवं, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@