बाप्पा निघाले भारत-पाक बॉर्डरवर!

31 Jul 2020 11:40:19
Indo pak_1  H x





मुंबई : कोरोना विषाणू संकटाने या वर्षी सगळ्याच सणांवर बंधने आणली असली तरी लोकांमध्ये सणाचा उत्साह कायम आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असते. परंतु कोरोनामुळे गणेशोत्सवावरही निर्बंध आले आहेत. गेल्यावर्षी काश्मिरात कलम ३७० रद्द झाल्यापासून गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आले आहे. गेल्या १० वर्षांपासून हा भारत-पाक बॉर्डरचा राजा सैन्याच्या मराठा रेजिमेंटमध्ये स्थानापन्न होतो.


गेल्यावर्षी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरात बाप्पाच्या आगमनाची विशेष तयारी करण्यात आली होती. गणपती बाप्पाची २ फुटांची मूर्ती गेल्यावर्षी स्थापन करण्यात आली होती. यंदाही कोरोनाच्या सावटामुळे २ फुटांचीच मूर्ती मुंबईहून काश्मीरला रवाना होणार आहे. शनिवारी १ ऑगस्टला दुपारी विद्याविहारच्या इंडियन नेवी बेसवरून किरण ईशर आणि आवटेदादा गणपती घेऊन काश्मीरला रवाना होणार आहेत. यावेळी प्रोग्रेसिव्ह नेशन या सामाजिक संस्थेद्वारे मास्क वाटप केले जाणार आहेत.
Powered By Sangraha 9.0