काँग्रेसच हे सरकार चालू देणार नाही : देवेंद्र फडणवीस

    दिनांक  31-Jul-2020 13:42:40
|


devendra fadnavis_1 


मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. कॅबिनेटमध्ये कोणताही समन्वय नाही राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र,अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे हे होताना दिसत नसल्याने हे सरकार फारकाळ टिकणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते. पण खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेलं हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारची सरकार कधीच चालली नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. भारताच्या राजकीय इतिहासानुसार काँग्रेसने अशी सरकार कधीच चालू दिली नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणो काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. हे लिव्ह इन रिलेशनशिपमधले हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  पुढे ते असेही म्हणाले आम्हाला हे सरकार पाडण्याची आवश्यकताच नहिये अंतर्विरोधानेच हे सरकार पडेल
 
 

राज्य सरकारच स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात ?


राज्य सरकारच स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना मिळून ठरवायचे आहे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. पण राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही. सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असतं, एक पुढे असतं, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत. त्यामुळे हे नेमकं चालंल कुठे आहे आणि याचा प्रमुख कोण आहे, हे समजणं कठिण आहे. खरं तर राज्याचा प्रमुख मुख्यमंत्रीच असतात. परंतु, अनेक सुपर मुख्यमंत्री पाहायला मिळतात, अनेक स्वयंघोषित मुख्यमंत्री पाहायला मिळतात. अनेक स्वयंघोषित नेते पाहायला मिळतात. अनेक नेते निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे कोणी काहीही केलं, तरी हा संशोधनाचा विषय आहे की, नेमकं या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे.' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.