सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता ईडीही चौकशी करणार?

    दिनांक  30-Jul-2020 17:18:35
|
sushant Singh Rajput_1&nb
नवी दिल्ली
: सक्तवसुली संचलनालाने बिहार पोलीसांना पत्र लिहून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तक्रार दाखल करण्याची विनंती केली आहे. 'पीएमपीएलए' (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरींग अॅक्ट) अंतर्गत हे प्रकरण तपासले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहार पोलीसांनीही यातील एफआयआरची कॉपी एजन्सीकडे सुपूर्द केली असल्याची माहीती आहे. सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून रिया चक्रवर्ती हीने १५ कोटी काढल्याचा आरोप त्याच्या वडीलांनी केला आहे. या प्रकरणात काही आर्थिक संबंध आहेत का, याचाही तपास केला जाऊ शकतो.
अभिनेता सुशांत सिंह राजपूचे वडील के के सिंह यांनी पाटणा शहरातील राजीव नगर ठाण्यात कलम 306, 341, 342, 380, 406 आणि 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सुशांत सिंहचे वडील यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या परीवारासह अन्य सहा सदस्यांविरोधात २५ जुलै रोजी एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर कंगनाने भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे आभार मानले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबद्दल लिहीलेल्या पत्रात ईडी आणि एनआयए यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होते असे म्हटले. यावर बॉलीवुड माफियांना सोडू नका, असे ट्विट कंगना रणौत टीम या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.