रियाने सुशांतला घरात बंदिस्त करून ठेवले होते : मीतू सिंह राजपूत

    दिनांक  30-Jul-2020 19:14:13
|

Meetu singh _1  भावाला भेटण्यासाठी तासान् तास वाट पहावी लागायची; सुशांतच्या बहिणीने नोंदविला जबाब


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने भीती दाखवून घर बदलवण्यास भाग पाडले होते आणि त्याच घरात त्याला कैद करून ठेवल्याचा हा खुलासा सुशांतची बहीण मीतू सिंहने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. पाटणा पोलिसांनी मीतूसह सुशांतचा कुक आणि जवळचा मित्र महेश शेट्टी यांचीही चौकशी केल्याचे सांगितले जात आहे.


मीतू सिंहने पाटणा पोलिसांना सांगितल्यानुसार, रियाने सुशांतला पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते. सुशांतला भूतांच्या गोष्टी सांगून तिने त्याच्या मनात भीती निर्माण केली आणि त्याला घर बदलवण्यास भाग पाडले. तिने सुशांतचा स्टाफही बदलून टाकला होता. सुशांतने २०१५मध्ये मुंबईत २० कोटींचे पेंट पेंटहाउस खरेदी केले होते. मात्र, तरीही तो भाड्याने राहात होता. ज्या घरात त्याने आत्महत्या केली, ते भाड्याचे घर होते.


मीतू सिंहने पोलिसांना सांगितले, 'मी जेव्हाही सुशांतला भेटायला त्याच्या वांद्र्यातील घरी जायचे, तेव्हा मला इमारती खाली तासन् तास उभे राहावे लागायचे. रिया सुशांतला मला भेटू देत नव्हती. सुशांत घरी नाही, असे कारण सांगितले जायचे. किंवा जोपर्यंत रिया घरी पोहोचत नाही, तोपर्यंत घराबाहेर उभे राहावे लागायचे, असा खुलासा मीतूने केला आहे.


मीतूच्या म्हणण्यानुसार, रियाला सुशांतच्या बहिणींनी त्याच्या घरात राहिलेले कधीच आवडले नाही. ती सुशांतबरोबर वारंवार भांडत असे. पण रियाची आई संध्या चक्रवर्ती कायम त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहात असे. यामुळे सुशांत खूप त्रस्त झाला होता. पण रिया आणि तिच्या कुटुंबाचा त्यांच्यावर खूप दबाव होता. रिया कायम त्याला ब्लॅकमेल करुन बदनाम करण्याची धमकी देत होती. मीतूच्या मते, सुशांतच्या घराचा ताबा रियाच्या घरच्यांनी घेतला होता. सुशांतला या नात्यातून बाहेर पडायचे होते, मात्र तो रियाच्या धमक्यांना घाबरायचा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.