रिया चक्रवर्तीची उच्च न्यायालयात धाव!

30 Jul 2020 15:15:08

rhea_1  H x W:


सुशांत आत्महत्या प्रकरण 'मुंबई'तच हाताळण्यासाठी खटाटोप सुरु!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रियाने तिचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत पाटणा येथे तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला खटला मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पाटणा पोलिस तिचा शोध घेत असून तिच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने रियाने हे पाऊल उचलले आहे.


यापूर्वी सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रियाविरूद्ध अजामीनपात्र कलमही लावले आहेत.


गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबीयांना अटक होण्याची शक्यता आहे. बुधवारी पाटणा पोलिस चौकशीसाठी तिच्या पत्त्यावर पोचले होते. मात्र माहिती देण्यासाठी तिच्या घरी कुणीही हजर नव्हते. सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा पोलिसांचे चार जणांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.


रियाची भेट न झाल्याने बिहार पोलिस मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. येथे सुशांतच्या माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येसंबंधीचा तपशील, तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक व्हिसेरा रिपोर्टही बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून घेतला आहे. या प्रकरणात सुशांतच्या सीएची बिहार पोलिस चौकशीही करणार असल्याचे बोलले जात आहे.




Powered By Sangraha 9.0