भूमिपूजनाचे मुख्य पुजारी प्रदीप दास कोरोना पॉझिटीव्ह

30 Jul 2020 15:06:50

Ram Mandir _1  




अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जण उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली होती. 
 
 
 
 
या संदर्भातील तयारीला वेग आलेला असतानाच आता येथील मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत. आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0