५ ऑगस्टला काश्मीर-अयोद्धेत दहशतवादी हल्ल्याचा पाकचा कट

30 Jul 2020 19:25:19
File pic_1  H x
 
 



नवी दिल्ली : ५ ऑगस्ट रोजी अयोध्या आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तानकडून रचला जात असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. अफगाणिस्तानातून २० तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही समजत आहे. ५ ऑगस्ट हा केंद्रातील मोदी सरकारसाठी महत्वाचा मानला जात आहे.


या दिवशी अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत शिलान्यास होणार आहे. त्यातच जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. याच दिवशी कट रचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट असल्याचे समजते. यापूर्वी ईदच्या दिवशी असाच कट रचण्यात आला होता. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्विस ग्रुपद्वारे प्रशिक्षित तालिबानी दहशतवादी देशातील काही भागात कट रचण्याचा प्रयत्ात आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांकडून काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याची सूचना मिळाली होती. 


या माहितीनुसार १५ ऑगस्टच्या दिवशीही दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत दहशतवादी संघटना आहेत. या इशाऱ्यानंतर अयोध्या, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ईद-उल-फितरनिमित्त २६ मे ते २९ मे २०२० पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी २० तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षित केल्याचा दावाही केला होता. सतर्कता बाळगल्याने हा डाव त्यांना साधता आला नाही. पाकिस्तानतर्फे नियंत्रण रेषेवरून २० ते २५ जणांना जम्मू काश्मीरसह नेपाळच्या सीमेवरून भारतात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. सुरक्षा यंत्रणानी या निमित्त सतर्कतेचा इशारा दिला आहे.





Powered By Sangraha 9.0