नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत : वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर

30 Jul 2020 16:44:30
Nawazuddin Siddiqui _1&nb





मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याचा भाऊ आणि परीवारातील काही अन्य सदस्यांविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. २७ जुलै रोजी त्याची पत्नी अंजना आंनंद किशोर पांडे उर्फ आलीया सिद्दीकी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. यापूर्वी आलीयाने घटस्पोट आणि पोटगीसाठी नवाजुद्दीनला कायदेशीर नोटीस पाठवली होती.


वर्सोवा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी कुटूंबाविरोधात आयपीसी ३५४, ३४३ (जाणूनबूजून एखाद्याला जखमी करणे), ५०४ (शांति भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबूजून अवमानित केले जाणे), ५०६ (धमकावणे) आणि ३४ (अपराधिक कृत्य) आदी प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. 


नवाज़ुद्दीन सिद्दीकीवर भावाची चूक लपवण्याचा आरोप त्याने केले आहे. आलीयाने नवाजुद्दीनच्या भावावर गंभीर आरोप केला आहे. एफआयआरमध्ये आलीयाने तिचा दीर मिनाजुद्दीन सिद्दीकीने मुलीवर लैगिंक शोषण केल्याचा आरोपही केला आहे. तसेच मारहाणही केल्याचा आरोप आहे. 


हा प्रकार नवाजुद्दीनला सांगण्यासाठी आलीया स्वतः २०१२मध्ये मुंबईत पोहोचली होती. त्यावेळी माझे करीअर आता सुरू झाले आहे, ही बाब आता उघड झाली तर मी अडचणीत येईल, असे नवाजुद्दीन म्हणाला, असाही आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. 



नवाजुद्दीनच्या सासू सासऱ्यांवरही आरोप


आलीया यांनी ससुर फैय्याजुद्दीन, अयाजउद्दीन आणि सासू मेहरुनिसा यांनी शिवीगाळ करून त्रास दिल्याचाही आरोप केला आहे. नवाजुद्दीने माझ्यावर अन्याय होत असतानाही गप्प राहण्यास सांगितले, असाही आरोप त्यांनी केला आहे.





Powered By Sangraha 9.0