भूमिपूजनादिवशी प्रभू श्रीरामनामात रंगणार न्यूयॉर्क सिटी

    दिनांक  30-Jul-2020 17:29:19
|

new york_1  H x


न्यूयॉर्क
: ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. भारतातील समस्त हिंदू बांधव या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.या सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. परंतु केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रा पार न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या १७ हजार चौरस फूट उंचीच्या बिलबोर्डवर एलईडी डिस्प्ले स्क्रीनवर मंदिराची प्रतिक्रिया आणि प्रभू श्रीराम यांची छायाचित्रे दाखवली जाणार आहेत. यासाठी तिकडे देखील जय्यत तयारी केली जात आहे.अमेरिकन इंडियन पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेवहानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अयोध्येत राममंदिराची पायाभरणी करतील तेव्हा आम्ही हा ऐतिहासिक क्षण येथेही साजरा करू. सेवहानीच्या म्हणण्यानुसार, १७ हजार चौरस फूट एलईडी डिस्प्ले स्क्रीन या सोहळ्यासाठी भाडे करारावर घेतली जाणार आहे. ही टाइम्स स्क्वेअरमधील हा सर्वात मोठी हाय रिझोल्यूशन एलईडी स्क्रीन असेल.सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत छायाचित्रे दाखविली जाणार

५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत हिंदी आणि इंग्रजीतील व्हिडिओ, भगवान श्रीराम यांच्या प्रतिमा व मंदिराच्या डिझाईन आणि आर्किटेक्चरच्या थ्रीडी प्रतिमा दाखवल्या जातील. पंतप्रधान मोदी मंदिराचे भूमिपूजन करतील तेव्हा त्यांची छायाचित्रे देखील येथे दर्शविली जातील. सेवहानीच्या यांच्यामते, येथे भारतीय लोक उपस्थित असतील. मिठाईचे वाटून आनंद द्विगुणित केला जाईल.


 
मानवी समाजासाठी एक मोठी संधी आहे

सेवहानी म्हणाले, ही जीवनात किंवा शतकात एकदा घडणारी ही घटना नव्हे असे प्रसंग संपूर्ण मानवजातीच्या जीवनात फक्त एकदाच येतात. म्हणून हा प्रसंग अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही टाइम्स स्क्वेअर निवडले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लोकांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण टाईम्स स्क्वेअर प्रभू श्रीरामांच्या रंगात न्हाऊन जाईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.