सरकारकडे फक्त मंत्र्यासाठी पैसा आहे का ? : केशव उपाध्ये

    दिनांक  30-Jul-2020 12:09:21
|

keshav upadhye_1 &nbमुंबई :
कोरोना संकटकाळात राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या गाडीखरेदीवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले. एकीकडे कोविड योध्यांचे पगार अडवले आहेत, या संकटकाळात अनेक वर्गांना सरकारी तिजोरीतून आर्थिक मदत नाकारली .आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे सांगत विकासकामांनाही स्थगिती दिली. मात्र दुसरीकडे मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रूपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी असा प्रश्न भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.करोना संकटकाळात बाराबलुतेदारांचे व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. दूधउत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर मिळत नसल्याने त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. आदिवासी बांधवांचे खावटी कर्जाचे अजून वितरण केलेले नाही. राज्यातील अनेक छोटे उद्योग अडचणीत आहेत. वाढीव वीजबिलांचा ग्राहकांना फटका बसलेला आहे, त्यावर अजुनही तोडगा काढलेला नाही. 'काटकसरीचे धोरण' या गोंडस नावाखाली राज्यातील विकासकामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. अशा सर्व समस्या असताना सरकार मात्र मंत्र्यांच्या अलिशान गाड्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. याआधीही राज्य सरकारने शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा गाड्यांची परवानगी दिलेली आहे. तेव्हा सरकारकडे फक्त मंत्र्यासाठी पैसा आहे का ?, असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.केंद्र सरकार राज्याला निधी देत नाही अशी ओरड राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून होत होती. मात्र, पीएम केअर फंडाकडून सर्वाधिक निधी हा महाराष्ट्रालाच मिळाला आहे तसेच जीएसटीचा परतावाही आपल्या राज्याला सर्वाधिक मिळाला आहे. केंद्र सरकारने रब्बी आणि खरीप पिकांच्या खरेदीची मर्यादा आणि मुदतही वारंवार वाढवून दिली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गतही राज्यातील सर्व घटकांना आर्थिक मदत केली. पण राज्य सरकारने मात्र राज्यातील जनतेला कोणत्याही स्वरूपातली आर्थिक मदत अथवा अनुदान दिलेले नाही, असा आरोपही उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.