प्रेक्षकांच्या भेटीला येतोय पहिला मराठी 'झोंबीपट'!

    दिनांक  30-Jul-2020 15:55:47
|

Zombivali_1  Hआदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’त झळकणार अमेय वाघ-ललित प्रभाकर!


मुंबई : प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम चित्रपट ‘झोंबिवली’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि यॉडली फिल्म्स निर्मित ‘झोंबिवली’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला. या चित्रपटातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे. चित्रपटाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.


बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित चित्रपट पाहिले आहेत. पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित चित्रपट बनतोय. या चित्रपटाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे चित्रपटाचे नाव 'झोंबिवली' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते 'झोंबिवली' हा चित्रपट तरुण पिढीला समोर ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचे उत्तम समीकरण प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे, याचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २०२१ ची वाट पहावी लागणार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.