दिल्लीत सीएमच्या निर्णयाने डिझेल ८ रुपये स्वस्त, महाराष्ट्रात कधी?

30 Jul 2020 13:30:10
Kejariwal UT_1  






नवी दिल्ली : दिल्लीच्या केजरीवाल सरकारने वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दराबद्दल महत्वाचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राजधानी दिल्लीत डिझेलच्या किमतीत ८ रुपये ३६ पैसे इतकी घट झाली आहे. डिझेलवर लावण्यात येणारा वॅट ३० टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे डिझेलचे दर ८२ रुपये प्रतिलीटर घटून ७३.६४ रुपये झाले आहेत. 


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. गुरुवारी दिल्लीतील कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे दिल्लीतील डिझेलच्या दरांबद्दल व्यापारी आणि सर्वसामान्यांनी चिंता व्यक्त केली होती. पेट्रोल पेक्षा डिझेल दरवाढ झाल्याने सरकारलाही जाब विचारला जात होता. याच पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
 
 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासह अर्थव्यवस्था रुळावर आणणे गरजेचे आहे, असे म्हटले. देशभरातील इंधन दरात सलग चौथ्या दिवशी कुठलाही बदल झआलेला नाही. गुरुवारी दिल्लीत पेट४ोल ८०.४३ रुपये प्रति लीटर होता. तर पेट्रोलचे दर ८१.९४ रुपये इतके होते. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलीटर ८९.१९ रुपये प्रतिलीटर आहे तर डिझेल ८०.११ रुपये प्रतिलीटर इतके आहे.
 
 
 
काँग्रेसने गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सत्तेत असूनही पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल आंदोलन केले होते. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. दिल्ली प्रमाणेच राज्यातही असा निर्णय झाला तर सर्वसामान्यांना कोरोना आपत्तीच्या काळात काहीसा दिलासा मिळू शकतो परंतू राज्य सरकारने इंधनावरील कर कोरोना संकटाच्या काळात वाढवला आहे, त्यामुळे तूर्त दिलासा शक्य नाही.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0