सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आदित्य व गृहमंत्र्यांवरही टीका

30 Jul 2020 15:54:13
sushant Singh Rajput_1&nb


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी घडामोडी आता वेगाने घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिहं राजूपत प्रकरणाची सीबीआय चौकशी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. पोलीसांना त्यांचे काम करू द्या, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी, कंगना रणौत यांच्यासह अन्य काही जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक करन जोहर, संजय लीला भन्साळी, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार होते. परंतू अचानक बिहार पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मुंबई पोलीसांना आता तूर्त या प्रकरणाचा तपास थांबवला आहे. 






 
 
 
या प्रकरणी नेटीझन्स आणि सुशांतच्या चाहत्यांनी गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख सुशांतच्या हत्याऱ्यांना पाठीशी घालू पाहत आहेत का, असा सवालही विचारला जात आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची करन जोहरशी असलेली जवळीक पाहता बॉलीवूड माफियांना राजकीय आश्रयामुळे सुट मिळतेय, असा आरोपही केला जात आहे. अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणी गेल्या आठवड्यात ट्विट केले होते. इतक्या दिवसांत काहीच धागेदोरे सापडले नसल्याने मुंबई पोलीसांनाही या प्रकरणावरून जाब विचारला जात आहे. नेटीझन्सने रिया चक्रवर्तीलाही टीकेचे लक्ष्य केले आहे. मुंबई पोलीसांनी चौकशीला बोलावल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी तिने धडपड सुरू केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.



Powered By Sangraha 9.0