३ लाख रोजगार देऊन सोनू सूद साजरा करणार वाढदिवस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020
Total Views |

Sonu sood_1  H


पूरग्रस्त आसाम, बिहारमध्ये सुरु करणार मदत मोहीम!


मुंबई : अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात प्रत्येक गरजूंना मदत केली आहे. कठीण काळात देवदूत बनून त्याने ज्या प्रकारे लोकांना मदत केली,त्यामुळे त्याचे कौतुक अजूनही सुरु आहे. इतक्या कौतुका नंतरही त्याच्या मदतीची तोफ सुरूच आहे. त्याने त्याच्या मदतीची व्याप्तीदेखील वाढविली आहे. पूर्वी, सोनू स्थलांतरितांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी मदत करीत होता, आता त्याने गरजू मागेल ती मदत,शेतकऱ्यांना मदत, बेरोजगारांना नोकरी देण्यासारख्या अनेक प्रकारच्या मदत हा अभिनेता करत आहे.


३० जुलै रोजी सोनू सूद आपला ४७ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. या दिवशी कुठलाही जल्लोष न करता एकमेकांना मदत करू असे आवाहन त्याने चाहत्यांना केले आहे. या दिवशी त्याने पूरग्रस्त बिहार आणि आसाममध्ये मदत मोहीम सुरु करण्याची योजना आखली आहे. तसेच त्याने सुरु केलेल्या प्रवासी रोजगारद्वारे ३ लाख नोकऱ्या देऊन तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. ट्विटरवरून त्याने या संदर्भात माहिती दिली.






सोनू सूदने ‘प्रवासी रोजगार’ नावाने रोजगार मोहीम सुरू केली आहे. त्यात अनेक बड्या कंपन्यांशी करार केला आहे. पुरामुळे आसाम आणि बिहारमध्ये कोट्यवधी लोकांचे नुकसान झाले आहे आणि बर्‍याच जणांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत, आता सोनू सूद या सर्वांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सोनूच्या या पुढाकाराने या पूरात सर्वकाही गमावलेल्या अशा सर्व लोकांसाठी नवीन आशा आणली आहे. पडद्यावर खलनायक साकारणारा सोनू खऱ्या आयुष्यात सर्वोत्कृष्ट नायक ठरला आहे.






@@AUTHORINFO_V1@@