जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी थेट लेह सीमेवर

    दिनांक  03-Jul-2020 13:05:16
|


PM_1  H x W: 0


भारत आणि चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेह सीमेला भेट दिली. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाख दोऱ्यावर गेले आहेत.leh _2  H x W:

पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.


leh _1  H x W:


पंतप्रधान सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि जवानांची भेट घेतली. याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. पंतप्रधान मोदीचा दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली.पंतप्रधान मोदी सकाळी लेह लडाखमधील नीमू येथे भेट देत लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत संवाद साधला. ठिकाण समुद्र सपाटीपासून ११,००० फुटांच्या उंचीवर आहे. सिंधू नदीच्या काठावर भारतीय जवानांचा कँप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अचानक लेह भेटीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.