लॉकडाऊन वाढवल्याने नाराज पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |
sharad pawar _1 &nbs





काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजू मांडण्यासाठी बैठक


मुंबई : महाविकास आघाडीतील नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच मैदानात उतरावे लागत आहे. लॉकडाऊन वाढवल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.



बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री आणि पवारांसह कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचीही बैठकीला उपस्थिती होती. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उद्योगधंदे व नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयामुळे नाराज आहे. या नाराजांची बाजू मांडण्यासाठी पवार पोहोचले आहेत. या बैठकीतून पुढे राज्यातील लॉक़डाऊन संदर्भातील निर्णय घेण्यात येतील.





@@AUTHORINFO_V1@@