चीनी ‘झूम’ला टक्कर देणार रिलायन्सचे ‘जिओ मीट’!

03 Jul 2020 12:12:10

jio meet_1  H x



जिओ मीटने एकाच वेळी करता येणार १०० लोकांना व्हिडीओ कॉल!


मुंबई : सध्या चीनविरुद्ध भारताने डिजिटल लढाही पुकारला आहे. भारताने चीनच्या तब्बल ५९ अ‍ॅप बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सना आता तगडे असे भारतीय पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. यातच व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये आघाडीवर असणार्‍या झूमला टक्कर देण्यासाठी रिलायन्सने आपल्या बहुप्रतिक्षित जिओमीट या सेवेला लाँच केल्याने या क्षेत्रात स्पर्धा रंगली आहे.


लॉकडाउनमध्ये व्हीडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे जिओमीट हा अजून एक पर्याय युजर्सकडे आला असून याद्वारे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय असलेल्या झूम अ‍ॅपला थेट टक्कर मिळेल.


जिओमीट हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झाले असून याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, हे अ‍ॅप पूर्णतः मोफत असणार आहे. या अ‍ॅपद्वारे १००पेक्षा जास्त जणांना एकाच वेळी व्हीडिओ कॉल करता येतील. जिओमीट अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करणारे आहे.


दरम्यान जिओमीट अ‍ॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स आहेत. या अ‍ॅपमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही.



Powered By Sangraha 9.0