कोरोनावरील आणखी एका भारतीय लसीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी!

03 Jul 2020 13:34:57

zydus_1  H x W:


‘COVAXIN’ पाठोपाठ झायडस कॅडीलाला देखील मानवी चाचणीसाठी परवानगी


मुंबई : भारतामध्ये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी लस विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ‘भारत बायोटीक’च्या Covaxin पाठोपाठ आता अहमदाबाद येथील झायडस कॅडीला हेल्थकेअर या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या मानवी चाचणीला डीसीजीआयकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता फेझ १ आणि फेझ २ मधील क्लिनिकल ट्रायलला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आयसीएमआर ने दिलेल्या पत्रानुसार ‘COVAXIN’चे क्लिनिकल रिपोर्ट्स १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करून लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


कोणतीही लस ही मानवी चाचणीमध्ये ३ टप्प्यांमधून जाते. यामध्ये पहिला टप्पा हा अगदीचा ठराविक लोकांसाठी असतो. यामध्ये लसीची मानवी शरीरावर चाचणी करून त्याचा प्रभाव पाहिला जातो. फेझ २ मध्ये मिडस्केलमध्ये अंदाजे शेकडो लोकांवर लस देऊन त्याची मात्रा अणि परिणाम पाहण्यासाठी चाचणी केली जाते. तर फेझ ३ मध्ये बहुसंख्य लोकांवर रॅन्डम टेस्ट केल्या जातात. त्याचे अहवाल तपासून पाहून पुढील निर्णय घेतला जातो.


सध्या भारतामध्ये वाढत असलेला कोरोनाचा धोका पाहता आता कमीत कमी वेळेत अधिक प्रभावी लस बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताप्रमाणेच परदेशात अनेक कंपन्या आणि संशोधकलस बनवण्याचे काम करत आहेत.



Powered By Sangraha 9.0