सलग ६ षटकार मारलेल्या गोलंदाजाचे युवीकडून कौतुक !

    दिनांक  29-Jul-2020 17:00:48
|

yuvraj _1  H x
 
नवी दिल्ली : २००७मध्ये झालेल्या टी – २० स्पर्धेमधील भारतीय माजी क्रिकेटपटूचा तो ६ बॉल ६ षटकार प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात आहे. यामुळे इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलाच लक्षात राहिला. परंतु, तरीही युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ५०० विकेट्सचे कौतुक करत सांगितले की, “सोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणे सोप्पे नसते.” त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या या कामगिरीचे अभिनंदनदेखील केले आहे.
 
 
 
 
 
युवराजसिंगने ट्विट केले की, “'मी जेव्हा ब्रॉडविषयी लिहितो तेव्हा त्याच्याविषयी सहा षटकाराचा प्रसंग जोडला जातो. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो, की त्याने जे साध्य केले आहे, त्यासाठी त्याचे अभिनंदन करा. कसोटीत ५०० बळी घेणे हा विनोद नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. तू महान आहेस! सलाम.”
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.