अनलॉक ३ : जिम, योगशाळांची टाळेबंदीतून मुक्ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |

Unlock 3_1  H x
 
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाची सध्याची परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ‘लॉकडाऊन’ आणि ‘अनलॉक’ संदर्भात बुधवारी सायंकाळी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने संपूर्ण देशभरात ‘लॉकडाउन’ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ‘कंटेनमेंट झोन’मध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ‘लॉकडाउन’ची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
 
 
मात्र असे असले तरी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ बाबतही नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये ‘नाइट कर्फ्यू’ हटवण्यात आला आहे. यानुसार ‘योगा इन्स्टिट्यूट’ आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर १ ऑगस्टपासून अनलॉक ३ च्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेनमेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथील करत अनके गोष्टी सुरु कऱण्यास परवानगी देण्यात येत आहे. केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार तसेच इतर महत्त्वाच्या विभागांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
‘अनलॉक ३’ची नियमावली
 
* नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय
* योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी
* सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी
* शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
* आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी.
* मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, सभागृह बंदच
 
- सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@