सुशांत आत्महत्या : संजय दत्त, सलमानला वाचवणारे वकील रियालाही वाचवणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |
sushant_1  H x

 

सलमान खानच्या वकीलाकडे रिया चक्रवर्तीची धाव; बिहारमधील खटल्याची चौकशी मुंबईत हस्तांतरित करण्याची केली मागणी


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता रियावर अटकेची टांगती तलवार आहे. बिहार पोलिसांचे एक पथक सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणी रियासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन मॅनेजर सौमियल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्या नावांचा समावेश आहे.


सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने सुशांतला धमक्या दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचे समजते. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी जामिनासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. सतीश मानशिंदे यांनी १९९३ मुंबई ब्लास्ट केसमध्ये अभिनेता संजय दत्तचा खटला लढला होता. काळवीट शिकारप्रकरणासह आणखी काही प्रकरणात ते सलमान खानचेही वकील होते.


दरम्यान, सुशांतचे वडील केके सिंग यांनी बिहारच्या पाटणा येथे दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रियाने बिहारमधील खटल्याची चौकशी मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.


सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर भांदवी कलम ३४१, ३४२, २८०, ४२०, ४०६, आणि ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हा आता सलमान आणि संजयला वाचवणारे वकील रियाला ही यातून बाहेर काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



@@AUTHORINFO_V1@@