जेएनयुमध्ये जाण्यासाठी दीपिकाने पाकिस्तानी एजंटकडून घेतले ५ कोटी!

    दिनांक  29-Jul-2020 14:22:11
|

Deepika_1  H xमाजी रॉ अधिकारी एन.के.सूद यांचा गौप्यस्फोट!


मुंबई : सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडच्या काळ्या वास्तवाचे नवनवीन पैलू रोज समोर येत आहे. बॉलीवूडचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांनी केला होता. त्यातच आता दीपिकाने जेएनयुमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानी एजंटकडून ५ कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप माजी रॉ अधिकारी एन.के. सूद यांनी केला आहे.


चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या दीपिकाची २०२० च्या सुरुवातीला जेएनयू आंदोलनातील उपस्थिती वादग्रस्त ठरली होती. सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत दंगे माजवण्यात आले होते. जेएनयुतील देशविरोधी नारे देणाऱ्या या समूहाचे दीपिकाने समर्थन केले होते. डाव्यांना मूक पाठींबा दिल्याने दीपिका विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्याचवेळी प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘छपाक’ चित्रपटावर प्रेक्षकांनी बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.


पुन्हा एकदा दीपिकाचे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सध्या या प्रकरणाचा एक नवा पैलू समोर आला आहे. जेएनयुमध्ये जाण्यासाठी दीपिकाने पाकिस्तानी व्यावसायिकाकडून ५ कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. माजी रॉ अधिकारी एन.के. सूद यांनी दीपिकावर हा आरोप केला आहे. सूद यांनी केलेल्या आरोपानुसार, पाकिस्तानी ब्रिटिश व्यावसायिका अनिल मुसरत यांच्या सांगण्यावरून दीपिका जेएनयू प्रोटेस्टॅटमध्ये गेली होती. आणि त्यासाठी तिला पाच कोटी रुपये देण्यात आले होते.

सूदच्या मते, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानबरोबर मुशरतचे खूप चांगले संबंध आहेत. मुसरत यांनी त्यांच्या कर्करोगाच्या रुग्णालयात गुंतवणूक केली आहे, याशिवाय ते इम्रान खान यांच्या पार्टी पीटीआयलाही पैसे देतात.


रॉ अधिकारी एन.के. सूद म्हणाले की, ‘मुसरतने २०१७मध्ये आपल्या मुलीच्या लग्नाचे आयोजन केले होते, त्यात अनिल कपूर, करण जोहर, रणवीर सिंग, सोनम कपूर आणि हृतिक रोशन यासारख्या मोठे कलाकार सहभागी झाले होते. सूद यांच्या मते, अनिल कपूरबरोबर २५ वर्षांपासून मुशरतचे कौटुंबिक संबंध आहेत. अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरच्या लग्नातही तो उपस्थित होता.


पुढे सूद म्हणाले की, ‘पाकिस्तानी एजंट मुशरत याच्या सांगण्यावरूनच दीपिका पादुकोण जेएनयू येथील सीएएविरोधी आंदोलनात भाग घेण्यासाठी गेली होती, त्यासाठी तिला पाच कोटी रुपये देण्यात आले होते. ईडी याचा तपास करीत आहे. मुशरतमुळे सोनम कपूरने देखील सीएएविरोधी प्रोटेस्टच्या समर्थनार्थ ट्विट केले, असा दावा सुद यांनी केला आहे.


रॉ अधिकारी एनके सूद यांचे हे विधान व्हायरल झाल्यानंतर दीपिका पादुकोणला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात येत आहे. मात्र या प्रकारानंतर बॉलीवूडमधल्या नेमक्या कोणत्या कोणत्या लोकांचा या प्रकरणाशी संबंध आहे याचा शोध घेतला जाणार आहे. या प्रकरणानंतर बॉलीवूडचे पाकिस्तानी एजंट आणि माफियांशी संबंध असल्याच्या वार्तांना खतपाणी मिळाले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.