यशोमान होणार आनंदीचा राजकुमार!

    दिनांक  29-Jul-2020 18:52:35
|

Yashoman_1  H x


'आनंदी हे जग सारे'मधून यशोमान आपटेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

मुंबई : 'आनंदी हे जग सारे' या मालिकेने काही वर्षांचा लीप अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढेच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट बघतेय. तिच्या स्वप्नातला हा राजकुमार म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून छोट्या पडद्यवरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे आहे. ‘फुलपाखरू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या यशोमानची ही दुसरी मालिका आहे. आनंदीची व्यक्तिरेखा रूपल नंद ही अभिनेत्री करते आहे. या मालिकेच्या निमित्ताने यशोमान आणि रुपल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या मालिकेच्या नवीन प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आनंदीचे बाबा म्हणेजच आस्ताद करत असेलली आनंदीची काळजी आणि स्वप्नाळू आणि स्वछंदी आनंदी या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आणि आनंदीच्या स्वप्नांचा राजकुमाराची म्हणेजच यशोमानची एंट्री सुद्धा मालिकेत होणार आहे. 'आनंदी हे जग सारे' या मालिकेचे नवीन भाग ३ ऑगस्टपासून आता नवीन वेळेत म्हणजे सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.