'नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्!' मोदींनी केले राफेलचे स्वागत

29 Jul 2020 17:55:04
Rafel Narendra Modi_1&nbs
 
 
 

नवी दिल्ली : पाच राफेल विमानांचा पहिला जत्थाहून फ्रान्सहून भारतात दाखल झाला आहे. देशाच्या भूमीवर विमाने उतरल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोकद्वारे विमानांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी ट्विट केले, 'राष्ट्र रक्षासमं पुण्यं, राष्ट्र रक्षासमं व्रतम्, राष्ट्र रक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च... नैव च... नभः स्पृशं दीप्तम्...स्वागतम्!' म्हणजेच, राष्ट्र सुरक्षेपेक्षा दुसरे कुठले पुण्य नाही, कुठले व्रत नाही कुठला यज्ञ नाही, गगनाच्या दिप्तिमानाचे स्वागत.




केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राफेलचे आगमन करत स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि वायुसेनेनेही राफेलचे स्वागत गेले. अमित शाह म्हणतात, वेग आणि क्षेपणास्त्रांची मारक क्षमता असलेले राफेल सर्वात शक्तीशाली आहेत. मला संपूर्ण विश्वास आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर वायुसेनेसाठी महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह व भारतीय वायुसेनेला या महत्वपूर्ण दिनानिमित्त शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0