देशात शैक्षणिक क्रांती घडविण्याच्या तयारीत मोदी सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs



नवी दिल्ली :
आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबत केंद्रीय मनुषबळ विकास मंत्रालयाचे (MHRD) नाव बदलून शैक्षणिक मंत्रालय करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.आज दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल हे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या धोरणाविषयी माहिती देणार आहेत.







पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवण्याच्या तयारीत असल्याचे कळते. राजधानी दिल्लीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. नव्या धोरणात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अमूलाग्र बदलाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. देशात मागील ३० वर्षात आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या मोठे बदल घडले आहेत. परंतु शिक्षणाव्यवस्थेत कोणताही मोठा बदल झालेला नाही. आता मोदी सरकार ही कमतरता भरुन काढण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.नव्या शैक्षणिक धोरणात नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, याची उत्सुकता आहे.


@@AUTHORINFO_V1@@