भारतीय लष्कराच्या इतिहासात नव्या युगाची सुरुवात

29 Jul 2020 17:08:23

rajnath sing _1 &nbs


नवी दिल्ली :
पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं आज भारतात दाखल झाली. हवाई दलाच्या अंबाला हवाई तळावर ही लढाऊ विमाने दाखल होताच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले. राफेल विमानांना पक्ष्यांची उपमा देत लॅण्डिंगविषयी माहिती देताना ट्विट केले की, “अंबाला येथे बर्ड्स सुखरुप दाखल झाले आहेत. राफेल लढाऊ विमानांचे भारतात आगमन ही आपल्या लष्करी इतिहासातील नव्या युगाची सुरुवात आहे. हि मल्टीरोल विमान हवाई दलाच्या क्षमतेत क्रांती घडवून आणेल. मी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करतो. मला खात्री आहे की, 'गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉन' 'उदयम आश्रम' या वाक्याचा आदर्श कायम ठेवतील. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेला वेळेवर चालना मिळाली याचा मला आनंद आहे."






दरम्यान, अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम १४४ (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.आतापर्यंत भारताकडे सुखोईच्या रुपात चौथ्या पीढीचं लढाऊ विमान होतं आता राफेलच्या रुपात ४.५ पिढीचे विमान भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. राफेलची ताकद जबरदस्त आहेच, शिवाय याची मारक क्षमता अतिशय भेदक आहे.

Powered By Sangraha 9.0