"वय वाढतंय तसा पवारांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढतोय"

    दिनांक  29-Jul-2020 11:53:12
|

sharad pawar_1  मुंबई :
अयोध्या राममंदिर भूमिपूजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होणार असून सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार आहे. तसेच काही विशेष आमंत्रितांच्या याद्या केल्या जात आहे. मात्र याबाबत कोणतीही घोषणा नसताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिपूजन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले तरी मी अयोध्येला जाणार नाही असे वक्तव्य केले. शरद पवारांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.ट्विट करत निलेश राणे यांनी बातमीचा हवाला देत म्हंटले, बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे नेते ओवेसी बोलतायंत पण नंतर शरद पवार यांचं नाव दिसलं . मात्र, एवढं खरं की पवार साहेबांचं वय बघून कोणी काही बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय" असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.


राम मंदिराच्या भूमिपूजनचा मुहूर्त निश्चित होताच 'राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही लोकांना वाटत असेल,' असे वादग्रस्त वक्तव्य करत शरद पवार यांनी राजकीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी राज्यातील भाजप नेत्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.तसेच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही लक्ष्य केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 'सीएनएन न्यूज १८' या वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा राम मंदिराबाबत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. 'राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. मात्र, भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण देशात सध्या करोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थिती राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे.' असे म्हणत राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला विरोध दर्शविला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.