सत्यासाठी जिद्दीने लढणाऱ्या 'मर्दानी'ला बॉलीवूड घाबरलं!

    दिनांक  29-Jul-2020 16:27:33
|
kangana _1  H x


#ArestrestKanganaRanaut ट्रेंडला टीम कंगनाचं धडक उत्तर!

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना राणावतने बॉलीवूड नेपोटीझम विरोधात धडाकेबाज मोहीम सुरू केली. बॉलीवूडच्या काळ्या वास्तवाला लोकांसमोर आणत तिने अनेकांचे खरे चेहेरे संग्ल्यांसमोर आणले. तिच्या या धडाकेबाज वृत्तीची बरीच चर्चा होत आहे. कंगना राणावत बर्‍याचदा सोशल मीडियावर आपल्या गोष्टी शेअर करताना दिसली. कंगनाच्या याच धाडसाला बॉलीवूड घाबरले की काय अस प्रश्न निर्माण झाल आहे. त्याला कारण आहे ट्विटरवर ट्रेंड होत असलेला #ArestrestKanganaRanaut ट्रेंड! या ट्रेंडला कंगनाकडूनही चांगलेच प्रत्युत्तर दिले गेले आहे.ट्विटरवर #Arestrest KanganaRanaut अचानक ट्रेंड होत असून अनेक लोक कंगनाला अटक करण्याची मागणी करत आहेत. मात्र हा हॅशटॅग ट्रेंडिंग पाहून टीम कंगना राणावतने एका ट्वीटमध्ये प्रत्युत्तर देऊन लिहिले आहे की, 'शेवटी बॉलिवूड मूव्ही माफियांना पेड ट्रेंडसाठी थोडे बजेट मिळाले आहे. चांगलंच आहे. या करा अटक म्हणजे कंगना या मुव्हीमाफियांचा खरा चेहरा लवकर समोर आणेल.’
कंगना राणावतला अटक का करावी? तिने काय केले? असे म्हणत कंगनाच्या चाहत्यांनीदेखील ट्रोलर्सला चांगलेच खडसावले आहे. कंगनाला अटक करा म्हणण्यापेक्षा या चंगूमंगू गँगने बॉलीवूड बाहेरून येणाऱ्या कलाकारांना का अपमानास्पद वागणूक दिली जाते यावर भाष्य करावं, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये ‘कंगनाला अटक करावी, म्हणजे न्यायालयात या चंगूमंगू गँगचे सत्य बाहेर येईल नि त्यांच्यावर कारवाई होईल’, असे म्हणत टीम कंगनाने ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.