दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्डमध्ये 'एक होतं पाणी' चित्रपटाची विशेष नोंद!

    दिनांक  29-Jul-2020 14:46:23
|
Ek hota paani_1 &nbs


व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीजची निर्मित चित्रपटाला विविध क्षेत्रांत एकूण ७ नामांकन पुरस्कार 


मुंबई : दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड २०१९ मध्ये 'एक होतं पाणी' या मराठी चित्रपटाची निवड झाली असून या चित्रपटाने विविध क्षेत्रात एकूण ७ नामांकन पुरस्कार प्राप्त केली आहेत.


भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा मराठी सिनेजगतात अतिशय सन्मानाचा समजला जातो. या पुरस्कारासाठी व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या 'एक होतं पाणी' या चित्रपटाची निवड झाली आहे. डॉ.प्रविण भुजबळ व विजय तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांचे असून योगेश अंधारे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे.


'एक होता राजा,एक होती राणी. उद्या म्हणू नका,एक होतं पाणी' अशी हट के टॅग लाईन असलेल्या या चित्रपटातून पाण्याची वास्तव दाहकता मांडण्यात आलेली आहे. याचीच नोंद घेऊन ' दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड २०१९' यासाठी "एक होतं पाणी" या सिनेमाला एकूण ७ नामांकन पुरस्कार मिळाले आहेत.


"बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यू- एक होतं पाणी, बेस्ट निगेटिव्ह रोल- अनंत जोग, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर- गणेश मयेकर, बेस्ट म्युझिक डिरेक्टर- विकास जोशी, बेस्ट सिंगर (मेल)- हृषीकेश रानडे, बेस्ट सिंगर (फिमेल)- आनंदी जोशी व बेस्ट लिरिसिस्ट- आशिष निनगुरकर" असे एकूण ७ नामांकने पुरस्कार मिळाले आहेत.


या चित्रपटात अनंत जोग, हंसराज जगताप, श्रीया मस्तेकर, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, यतीन कारेकर, रणजित जोग, दीपज्योती नाईक, त्रिशा पाटील, जयराज नायर, आशिष निनगुरकर, डॉ.राजू पाटोदकर, शीतल शिंगारे, शीतल कल्हापुरे व उपेंद्र दाते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन व गीते आशिष निनगुरकर यांनी लिहिली असून संगीतकार म्हणून विकास जोशी यांनी काम केले आहे.


ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, रोहित राऊत व विकास जोशी यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. प्रतिश सोनवणे, सुनील जाधव व स्वप्नील निंबाळकर यांनी निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट मागच्या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाला विविध फेस्टिवलमध्ये गौरविण्यात आले आहे.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.