निमंत्रण आलं तरी भूमिपूजनाला जाणार नाही : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020
Total Views |




sharad pawar_1  



मुंबई :
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुरुवातीला राममंदिर भूमिपूजन सोहळ्यास विरोध करणाऱ्या शरद पवारांनी 'भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही,' असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे बकरी ईद तसेच कुर्बानीच्या बैठकांना हजर राहणाऱ्या पवारांना राममंदिर भूमिपूजनावरूनच इतका पोटशूळ का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनचा मुहूर्त निश्चित केला होता. 'राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही लोकांना वाटत असेल,' असे वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी राज्यातील भाजप नेत्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.तसेच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही लक्ष्य केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 'सीएनएन न्यूज १८' या वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा एकदा राम मंदिराबाबत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. 'राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. मात्र, भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण देशात सध्या करोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थिती राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे.' असे म्हणत राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला विरोध दर्शविला आहे.



'कही पूजन कही सुजन'


मंदिर भूमिपूजनाची वेळ जशी जवळ येत आहे, त्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अनेक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी याविरोधात विधाने सुरू केली आहेत. याचा समाचार नेटीझन्सनी घेतला आहे. सोशल मीडियावर 'कही पूजन कही सुजन' असा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला आहे. यात अनेकांना मिम्स शेअर करत अशी विधाने करणाऱ्यांवर टीका केली आहे.


@@AUTHORINFO_V1@@