राम मंदिराला विरोध करणाऱ्या पवारांना ईदमध्ये इतका रस का ?

28 Jul 2020 15:19:44

sharad pawar_1  




मुंबई :
१ ऑगस्ट रोजी असणाऱ्या बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यावर सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक घेतली. कोरोनाच आमचे प्राध्यान्य आहे, असे सांगणाऱ्या पवारांना कुर्बानीसाठी मंत्र्यांची वेगळी बैठक घ्यावी लागत आहे. दरम्यान, ईद संदर्भात वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी देखील बैठक घेण्यात आली होती. या बैठकांच्या सत्रावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.



यावेळी ते म्हणतात, "काही वर्षांपूर्वी हिंदू दहशतवादाचे तुणतुणे वाजणारे शरद पवार सध्या कोरोनाच्या आडून राम मंदिराचा विरोध करतायत. मंदिराचे भूमीपूजन करून करोना जाणार काय? असा सवाल करणारे शरद पवार बकरी ईदसाठी बैठकांवर बैठका का  घेत आहेत. त्यामुळे आता ईद साजरी करून करोना जाणार आहे काय? या प्रश्नच उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं', अशी मागणी त्यांनी केली.



पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत ते म्हणाले, "राज्याचे सेक्युलर मुख्यमंत्री राममंदिराचे भूमिपूजन ई - भूमिपूजन करा असा सल्ला देतात. हाच सल्ला शरद पवारांना देताना त्यांचे स्टिअरिंग वरचे हात थरथर कापतात का ? कारण हा सल्ला दिला तर आपले मुख्यमंत्री पद जाईल." असे म्हणत त्यांनी बकरी ईदवरून महाविकास आघाडीत सुरु असणाऱ्या घडामोडींचा कठोर शब्दांत समाचार घेतला.

Powered By Sangraha 9.0