अखेर दहावीचा निकाल लागणार !

28 Jul 2020 16:30:58

SSC_1  H x W: 0
 
 
मुंबई : कोरोनामुळे स्थगित असलेला दहावीचा निकाल अखेर २९ जुलैला जाहीर होणार असून दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल उपलब्ध असणार आहे.
 
 
 
 
 
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय केली आहे. तसेच बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन ५७७६६ वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0