राम मंदिर ट्रेंड : कही पूजन कही सुजन

    दिनांक  28-Jul-2020 13:08:31
|

Ram Mandir_1  H
नवी दिल्ली : राम मंदिर भूमिपूजनाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसे डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिराच्या अभूतपूर्व सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनद्वारे दाखविले जाणार आहे, मात्र, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) ‘दूरदर्शन’ या सरकारी वाहिनीने करू नये, असे पत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) खासदार बिनॉय विस्वम यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिले आहे. 

तर कम्युनिस्टांना आता कामधंदा उरलेला नाही, म्हणून ते असे प्रकार करीत असल्याची प्रतिक्रिया श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आम्हाला कोरोनापेक्षा मंदिर महत्वाचे नाही, काहींना मंदिर बांधल्याने कोरोना जाईल, असे वाटते अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली होती. 

मंदिर भूमिपूजनाची वेळ जशी जवळ येत आहे, त्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात साकेत गोखले यांनी भूमिपूजन रोखण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन केले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहेत. अनेकांच्या भावना या मुद्द्याशी जोडल्या आहेत. परंतू अनेक डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी याविरोधात विधाने सुरू केली आहेत. याचा समाचार नेटीझन्सनी घेतला आहे. सोशल मीडियावर 'कही पूजन कही सुजन' असा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला आहे. यात अनेकांना मिम्स शेअर करत अशी विधाने करणाऱ्यांवर टीका केली आहे. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.