राम मंदिर भूमिपूजन : बद्रीनाथमधून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी आयोध्येला रवाना!

28 Jul 2020 10:01:57

ram mandir_1  H


५ ऑगस्टला पार पडणार राम मंदिर भूमिपूजन सोहळा!

मुंबई : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराकचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी बद्रीनाथ येथून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनीधी सोमवारी अयोध्या येथे अलकनंदा नदीचे पाणी आणि बद्रीनाथ येथील माती घेऊन गेले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केवळ २०० लोक उपस्थित असतील. त्यापैकी १५० आमंत्रित पाहुणे असतील. तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.


राम मंदिर उभारण्यापूर्वी जमिनीत २००० फूट खाली एक टाईम कॅप्सूल पुरण्यात येणार आहे. भविष्यात पुढील पिढ्यांना राम मंदिर आणि त्याच्या इतिहास याविषयी माहिती देण्यासाठी ही कॅप्सुल उपयुक्त ठरेल. तसेच वर्तमानातील विविध घटना यामध्ये नमूद केल्या जातील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चौपाल यांनी काल दिली होती. त्यानंतर आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी त्या संदर्भातील पूर्वतयारीला वेग आला आहे.




Powered By Sangraha 9.0