सर्वाधिक जीएसटी परतावा महाराष्ट्राच्या तिजोरीत

28 Jul 2020 16:17:58

GST_1  H x W: 0



मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून जीएसटी परतावा देण्यावरुन राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजप यांच्यात वाद निर्माण झाला होता, केंद्रात भाजपाचं सरकार असल्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी विरोधी पक्ष भाजपवर टीका करत होतं. मात्र आता केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे. याबद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच केंद्र सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या राज्य सरकारने आता केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.



GST_1  H x W: 0

केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०१९-२०मधील जीएसटी परताव्याचे सर्वाधिक म्हणजे १९ हजार २३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, त्यानंतर कर्नाटकला १८ हजार ६२८ कोटी रुपये जीएसटी परतावा म्हणून मिळाले आहेत. सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेला परतावा सर्वाधिक आहे. यामुळे महाराष्ट्राला संकटकाळात भरपूर निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती. त्यामुळे जीएसटी परताव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला केंद्राकडून १९ हजार २३३ कोटी इतकी भरघोस रक्कम मिळाली आहे.


Powered By Sangraha 9.0