फोर्ब्सच्या शंभर ब्रॅण्ड्सपैकी एकही स्वदेशी नाही !

28 Jul 2020 18:31:53

apple_1  H x W:



नवी दिल्ली : फोर्ब्सने २०१९ आर्थिक वर्षातील जगातील टॉप १०० सर्वाधिक मुल्यवान ब्रॅण्ड्सची यादी जाहीर केली आहे. यानुसार, अॅपल २४१.२ अब्ज डॉलर्स (१८ लाख कोटी) रुपयांचा ब्रॅण्ड ठरला. जगातील सर्वाधिक मौल्यवान ब्रॅण्ड कंपनी, असा किताब स्वतःच्या नावे केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अॅपलची १७ टक्के वृद्धी झाली आहे. 

फोर्ब्सने टॉप-१०० अशा मुल्यवान ब्रॅण्ड कंपन्यांची यादी जाहीर केली. २४ टक्क्यांच्या वृद्धीसह गुगल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुगलचे ब्रॅण्ड व्हॅल्यूएशन २०७.५ दशलक्ष डॉलर इतके आहे. गेल्या वर्षभरात गुगलच्या ब्रॅण्डमध्ये २४ टक्के वृद्धी झाली आहे. मायक्रोसॉफ्टचे १६३ दशलक्ष डॉलर (१२ लाख कोटी रुपये) इतके मुल्य आहे. गतवर्षात यात ३० कोटी वृद्धी झाली आहे.


शंभर पैकी ५० कंपन्या अमेरिकन 

टॉप-१०० मोस्ट वॅल्यूएबल ब्रॅण्ड्समध्ये अमेरिकन कंपन्यांचा सामावेश आहे. सर्वात अग्रगण्य असलेल्या पाच कंपन्यांमध्ये टेक कंपन्यांचा सामावेश आहे. अनुक्रमे अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझोन आणि फेसबूकचा सामावेश आहे. या पाचही कंपन्यांचे मुल्यांकन ८१७.३ दशलक्ष डॉलर इतके आहे. फेसबूकच्या मुल्यांकनात २१ टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. तरीही पहिल्या पाच कंपन्यांमध्ये स्थान टीकवून ठेवले आहे.

क्रम ब्रॅण्ड ब्रॅण्ड व्हॅल्यू (डॉलर्समध्ये) एका वर्षात बदल

१ अॅपल २४१.२ १७%

२ गूगल २०७.५ २४%

३ मायक्रोसॉफ्ट १६२.९ ३०%

४ अॅमेजन १३५.४ ४०%

५ फेसबूक ७०.३ -२१%

६ कोका-कोला ६४.४ ९%

७ डिज्नी ६१.३ १८%

८ सॅमसंग ५०.५ -५%

९ लुईस विट्टन ४७.२ २०%

१० मॅक्डॉनल्ड ४६.१ ५%
(स्त्रोत - फोर्ब्स)

एकाही भारतीय कंपनीचा सामावेश नाही


फोर्ब्सच्या यादीतील एकही भारतीय कंपनीचा सामावेश नाही. या यादीत शंभराव्या स्थानी फॉक्सवॅगन या कंपनीचे नाव आहे. ७.९ दशलक्ष डॉलर्स (५९ हजार कोटी) इतक्या मुल्यासह आपले स्थान टीकवून आहे. मात्र, बाजार भांडवलाचा विचार केल्यास भारतीय कंपन्या या कंपन्यांच्या पुढे आहेत. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या ४७ कंपन्यांचे बाजार भांडवल हे ५९ हजार कोटींहून जास्त आहे. ब्रॅण्ड व्हॅल्यू आणि बाजारातील भांडवल या दोन भिन्न गोष्टी मानल्या जातात.

Powered By Sangraha 9.0